Showing posts with label शुभेच्छा ( wishes ). Show all posts
Showing posts with label शुभेच्छा ( wishes ). Show all posts

Wednesday, October 19, 2022

दीपोत्सव

आनंदाचा क्षण हा आला

हर्षित सारा जन हा झाला

चोहीकडे हे दीप उजळले

अंधारावर घातला घाला 


वैफल्याच्या अन् दुःखाच्या

आठवणींना विसरूनी जाऊ

आनंदाच्या उत्सवात या

प्रफुल्लित होऊनी न्हाऊ 


दीप असे हा ज्ञानाचा अन्

दीप असे हा समृद्धीचा

अज्ञानाला, नैराश्याला

संपवण्याचा मार्ग सुखाचा 


माझ्यासंगे इतरांचेही

भले व्हावे ही बाळगू इच्छा

नांदो सौख्य सर्वांच्या दारी

दीपोत्सवाच्या याच शुभेच्छा...!!!

✒ K. Satish





Wednesday, February 9, 2022

सहलीसाठी आनंदमयी शुभेच्छा

आनंदाचा घडो प्रवास हा

मनापासूनी तुम्हा शुभेच्छा,

धकाधकीच्या जीवनातूनी

उसंत मिळावी हीच ती इच्छा 


भ्रमण करूनी विविध ठिकाणी

आनंद घ्यावा क्षणाक्षणाचा,

मरगळ संपो जीवनातली

उत्साह वाढो तनामनाचा 


सवंगड्यांनो करा साजरा

आनंद सोबत फिरण्याचा,

नसलो तनाने जरी मी संगे

भास व्हावा मी असण्याचा 


आनंद तुमचा तोच हो माझा

नाही वेगळा आणखी काही,

व्यस्त जरा सध्या मी आहे

आणखी दुसरे काही नाही

✒ K. Satish



Friday, April 30, 2021

कामगार देशाची शान

आर्थिक योद्धे देशाचे आम्ही

देशाची हो शान,

उद्योगाचा पाया आम्ही

उद्योगाचा मान


क्षेत्र असो मग कोणतेही आम्ही

भीत नाही हो कष्टाला,

अर्थशास्त्राचा कणा आम्ही

संकटात तारतो देशाला


घरघर घरघर यंत्र चालवीत

चक्र फिरवतो प्रगतीचे,

कामे करतो सर्वतर्‍हेचे

कष्टाचे नि बुद्धीचे


संकटकाळी कोरोनाच्या

जगणे होते अवघड हो,

भय होते जीवाचे तरीही

ना टाळले कामाला हो


प्रगतीपथी नेण्या देशाला

करू आम्ही जीवाचे रान,

कामगार देशाची संपत्ती

देश आमचा जीव की प्राण

✒ K. Satish






महाराष्ट्र

महापुरूषांची भूमी आमुची

आहे तिचा आम्हा अभिमान,

निष्ठा आमची सदा तिच्यावरी

तीच आमचे जीव की प्राण


स्वर्गसुख या मातीमध्ये

अगाध खजिना संस्कारांचा,

या भूमीमध्ये जन्म जाहला

अंतही व्हावा इथेच आमुचा


माय मराठी भाषा आमुची

मान सर्व भाषांचा ठेवतो,

आम्ही शिकतो इतरही भाषा

इतरांनाही मराठी शिकवतो


कितीही आली संकटे तरीही

एकजुटीने लढतो आम्ही,

देशासाठी लढणारांची

भासे कधी ना येथे कमी


महाराष्ट्राचा डंका वाजे

चारी दिशांमध्ये नाव हे गाजे,

महान अशा या राज्याला हो

'महाराष्ट्र' हे नावच साजे

✒ K. Satish





Sunday, March 21, 2021

जागतिक काव्यदिनाच्या शुभेच्छा

कळले नाही मला 

हे शब्द कसे आले,


लिहीत गेलो हळूहळू

आणि काव्य पूर्ण झाले.


शांतपणे बसता 

डोळे मिटून गेले,


स्मृतीमधील काही

जुने क्षण जागे झाले.


आठवूनी त्यांना 

मग शब्दधागा विणला,


अशाप्रकारे माझा 

कवितासंग्रह बनला.


जागतिक काव्यदिनाच्या

सर्व कवी, साहित्यिक व काव्यरसिकांना मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

✒ K. Satish



Monday, March 8, 2021

जागतिक महिला दिन

धकाधकीच्या जीवनात जर का तुम्हाला

बनायचे असेल सशक्त महिला,

तर मग रूसण्या-फुगण्याच्या बाबतीत

ठेवू नका तुमचा नंबर पहिला


मनगटातील जोराच्या बाबतीत

पुरूष भलेही असतील तुमच्यापेक्षा वरचढ,

पण सहनशक्तीच्या बाबतीत मात्र

नेहमी तुमचेच पारडे असते जड


मुलांना प्रेम द्या

तुमच्या प्रेमळ मातृत्वाने,

स्वतःला सिद्ध करा

तुमच्या अभूतपूर्व कर्तृत्वाने


संसार सांभाळता सांभाळता 

दाखवून द्या तुमची चमक,

 सर्वांनाच कळू द्या, बाहेरील जगाला तोंड देण्याची

तुमच्यामध्ये सुद्धा आहे धमक...!!!

✒ K. Satish




Monday, February 22, 2021

लाडक्या लेकीस वाढदिवसाच्या शुभेच्छा...

लाडक्या लेकीस, सिद्धीस

जन्मदिवसाच्या खूप खूप

शुभेच्छा...


आनंदाचा क्षण हा आला

जन्मदिन हा तुझा गं आला,

धकाधकीच्या जीवनात या

आनंदाचा वर्षाव झाला 


प्रगतीपथावर जावे तू गं

स्वतःस घडवत न्यावे तू गं,

येथील अडथळे अगणित तरीही

अद्वितीय कार्य करावे तू गं 


क्षमता आहे तुझ्यात मोठी

जिद्द, चिकाटीदेखील मोठी,

आकार देऊन जीवनास तू

कार्य करावे देशासाठी

✒ K. Satish





Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts