Sunday, March 2, 2025

हो...मी विद्रोही

 म्हणते कोणी विद्रोही मजला
म्हणते कोणी वेडा
मुखात कटू पण सत्य बोलतो
जसा औषधी काढा

इथे नित्य स्तुतीची आस
मोठेपणाचा सर्वांना ध्यास
पचेल कैसे कडवे बोल हे
म्हणूनच माझा साऱ्यांना त्रास

सत्तेला मी जाब विचारतो
प्रस्थापितांशी निर्भीड भिडतो
नियंत्रणात ना येतो त्यांच्या
म्हणूनच त्यांचा दुश्मन ठरतो

सामाजिक न्यायासाठी अन्
अन्यायाला गाडण्यासाठी
सदा राहतो मी कार्यरत
जनजागृती करण्यासाठी

पचत नाही हे धनदांडग्यांना
चिखलफेक माझ्यावर करती
बदनामी माझी करण्याला
षडयंत्र ते नित्य हो रचती

पडत नाही हो फरक मलाही
जगणे माझे असे स्वाभिमानी
रचा कितीही तुम्ही षडयंत्र
तुमची नियतच असे बेईमानी

धोरणे माझी पक्की आहे
सत्यवदनाला नाही डरावे
अन्यायाचा परीघ मोठा
तरीही त्याला पुरून उरावे

✒ K. Satish



Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts