संविधान संविधान संविधान
आहे तो आमचा स्वाभिमान
तोच सर्वश्रेष्ठ ग्रंथ आमुचा
आहे तो भारत देशाची शान
एकसंघ भारत याच्यामुळेच
स्वातंत्र्य रंगांचे यामुळेच
विविधतेत एकता याच्यामुळेच
समान न्याय-कायदा याच्यामुळेच
यात नियम स्त्रियांच्या हक्कांचे
माणसाला माणूस बनवण्याचे
न्यायासाठी लढा देण्याचे
सत्तेला जाब विचारण्याचे
राजकारणी अन् सारे अधिकारी
कर्तव्यात कसूर करतात
अन् मग अशा महान ग्रंथाला
कमजोर करण्याचे पाप करतात
हा ग्रंथ आहे भारताची शान
वाढवला जगी भारताचा मान
पालन करूनी आपण याचा
हृदयापासून करूया सन्मान
✒ K. Satish