🙏🏻 विनम्र अभिवादन 🙏🏻
वसा घेतला समाजसुधारणेचा
ठाव घेतला बहुजनांच्या मनाचा
प्रतिकार केला दुष्ट जातीभेदाचा
अभिमान वाटतो महान आमच्या राजाचा
शिक्षणाचे महत्त्व जाणूनी त्यांनी
बहुजनांना शिक्षित केले
अज्ञानाच्या काळ्या छायेतूनी
ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेले
शेतीला दिले सर्वोच्च प्राधान्य
दीनदुबळ्यांची दूर केली लाचारी
रयतेचे शोभतात राजे खरे
बहुजनांचे खरे कैवारी...!!!
तळागाळातील लोकांसाठी लढणाऱ्या,
बहुजनांना ज्ञानाचा अधिकार मिळवून देणाऱ्या,
अंधश्रद्धा आणि जातीभेदावर कडाडून प्रहार करणार्या,
शेतीला सुजलाम् - सुफलाम् करण्यासाठी विविध उपाययोजना राबवणार्या
अशा या रयतेच्या महान राजाला
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!!!
✒ K. Satish
No comments:
Post a Comment