महापुरूषांची भूमी आमुची
आहे तिचा आम्हा अभिमान,
निष्ठा आमची सदा तिच्यावरी
तीच आमचे जीव की प्राण
स्वर्गसुख या मातीमध्ये
अगाध खजिना संस्कारांचा,
या भूमीमध्ये जन्म जाहला
अंतही व्हावा इथेच आमुचा
माय मराठी भाषा आमुची
मान सर्व भाषांचा ठेवतो,
आम्ही शिकतो इतरही भाषा
इतरांनाही मराठी शिकवतो
कितीही आली संकटे तरीही
एकजुटीने लढतो आम्ही,
देशासाठी लढणारांची
भासे कधी ना येथे कमी
महाराष्ट्राचा डंका वाजे
चारी दिशांमध्ये नाव हे गाजे,
महान अशा या राज्याला हो
'महाराष्ट्र' हे नावच साजे
✒ K. Satish
No comments:
Post a Comment