जे स्वप्नातही आले नव्हते ते आता घडत आहे
जीवाचे महत्त्व सार्या जगाला कळत आहे,
पैशालाच सर्वस्व मानणार्यांना आता
आयुष्याचा खरा अर्थ हळूहळू उमजत आहे
राग, लोभ, द्वेष, मत्सर याकडे लक्ष जाईना
पैशाची हावही आता मनाचा ठाव घेईना,
मोठ्या हौशेनं बांधलेल्या स्वतःच्याच घरात
माणसांचा वेळ आता काही जाईना
पैशासाठी जीव घेणार्यांना स्वतःचे मरण दिसले
कपटाने आपल्याच लोकांना लुटणार्यांचे गणित फसले,
असत्याच्या मार्गाने जमा केलेली धनदौलत रुसली
अन् चांगल्या चांगल्यांच्या चेहर्यावर मृत्यूचे भय दिसले
एवढ्या मोठ्या आपत्तीने सार्यांनाच शिकवण दिली
भोगविलास त्यागून जगण्याची हिम्मत दिली,
पैशाने श्रीमंत नसलेलाही वेळेला उपयोगी ठरतो
गोष्ट किती ही मोलाची सार्यांनाच पटवून दिली
वाईटामधूनही चांगले घडलेल्याकडे लक्ष द्यावे
मोठेपणाला सोडून सौजन्याने वागत रहावे,
चांगला बदल जो घडला आहे तो असाच अखंड रहावा
अन् पृथ्वीतलावर माणुसकीने सदैव बहरत जावे...
✒ K. Satish
कोरोना शाप की वरदान????..Very Nice..
ReplyDelete🙏🏻
Delete